संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

अंकित मोहन करणार ‘क्रेझी ऍप’ च्या रॅप सॉंगमधून प्रेक्षकांवर जादू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अभिनेता अंकित मोहन आजवर मालिका चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला. त्याने हिंदी आणि मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनयाची जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता मात्र अंकित एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, नुकत्याच सुरु झालेल्या क्रेझी ऍपच्या गाण्यात अंकित पाहायला मिळत आहे. ‘क्रेझी क्रेझी क्रेझी’ असे या रॅप सॉंगचे बोल असून या गाण्यात अंकित मुख्य भूमिकेत दिसत आहे. या रॅप सॉंग मधून अंकितने क्रेझी ऍप नेमकं काय आहे हे सांगितले आहे. या गाण्यात अंकित एनर्जेटिक पाहायला मिळाला आहे.

अंकितने गाण्यातून केलेल्या या क्रेझी ऍपच्या प्रशंसेबाबत बोलायचे झाले तर या ऍपमध्ये क्रिएटर, कलाकार यांच्या जोडीला ऑडियन्सलाही संधी मिळणार आहे. भाषेचे बंधन नसणाऱ्या या क्रेझी ऍपमधून एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उत्तम प्लॅटफॉर्म असणार आहे. अंकितने या गाण्यातून कलाकागुणांना प्लॅटफॉर्म मिळाला आहे तर त्याचा योग्य तो परी उपयोग करा हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

या क्रेझी रॅप सॉंगची निर्मिती निर्माते देवभाई खेतभाई भतेसार, ओमकार विलास दळवी, सुरेंद्र राजेंद्र कुडतडकर यांनी केली असून दिग्दर्शक अमोल जाधव यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे. या गाण्याचे क्रिएटिव्ह हेड आणि ‘क्रेझी ऍप’चे फाउंडर म्हणून संकेत सूर्यकांत शिंत्रे यांनी बाजू सांभाळली आहे. तर या गाण्याला सुरेश विश्वकर्मा यांनी आपली कॅमेऱ्यात कैद केले आहे. या गाण्याचे बोल आर. विशाल लिखित असून त्यानेच या गाण्याच्या संगीताची बाजू सांभाळली असून गाणे देखील गायले आहे. हे गाणे कोरियोग्राफर संदेश वसंत नेवरेकर याने कोरियोग्राफ केले आहे.

या गाण्याचे क्रिएटिव्ह हेड आणि ‘क्रेझी ऍप’चे फाउंडर संकेत शिंत्रे असे म्हणतात की, “हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येण्याचे खास कारण म्हणजे नव्या प्लॅटफॉर्म ची जनजागृती होय. अंकितने या गाण्यात उत्तम बाजू सांभाळली आहे. अंगी दडलेल्या गुणांना योग्य असा प्लॅटफॉर्म मिळवून देण्यास हे गाणे नक्कीच जबाबदार राहील यांत शंकाच नाही. एका ऍपचे गाणे बनवणे हा देखील नवा टास्क माझ्या समोर होता मात्र संपूर्ण टीमच्या साहाय्याने आम्ही हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलो आहोत”.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami