संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अंधेरीच्या राजाचे मंगळवारी संकष्टी चतुर्थी दिवशी विसर्जन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- अंधेरीच्या राजाचे मंगळवारी अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी विसर्जन मिरवणूक जल्लोषात निघणार आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता आरती झाल्यावर सजवलेल्या ट्रकवर अंधेरीच्या राजाची मूर्ती ठेवण्यात येईल.
विसर्जन मिरवणूक जल्लोषात निघणार आहे. आझाद नगर,अंबोली,अंधेरी मार्केट,एस.व्ही.रोड,जयप्रकाश रोड वरून राजकूमार,अपनाबाजार, चार बंगला, पिकनिक कॉटेज, मछलीमार, गंगाभवन मार्गे वेसावे समुद्रकिनारी दुसऱ्या दिवशी पोहचेल. तेथे येथील माजी नगरसेवक दिवंगत मोतीराम भावे यांच्या कुटुंबांनी अंधेरीच्या राजाची पूजा केल्यावर बुधवारी 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास 18 तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे येथील खोल समुद्रात विसर्जन होईल. 1974 पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. जोपर्यंत अंधेरीच्या राजाचे विसर्जन होत नाही, तोपर्यंत अंधेरीचा गणेशोत्सव संपत नाही. तसेच अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावरच अंधेरीकर संकष्टीचा उपवास सोडतात अशी अंधेरीकरांची दृढ श्रद्धा आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami