संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

अंधेरी पोटनिवडणुकीत २५ जण रिंगणात खरी लढत लटके-पटेल यांच्यातच होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – पुढील महिन्यात होणाऱ्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीची देशभरात चर्चा आहे.ठाकरे-शिंदे गटाचे नाव आणि चिन्हाचा मुद्दा, त्यानंतर ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा कोर्टात पोहोचलेला वाद यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्याविरुद्ध शिंदे गटाचा नाही तर भाजपचा उमेदवार असणार आहे.या निवडणुकीत प्रमुख लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल यांच्यात होणार असली तरी तब्बल २५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख काल १४ ऑक्टोबर होती. १६६-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी २५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे दाखल केली आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटाने सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सावध पवित्रा घेत आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.ऋतुजा लटके यांच्यासोबतच संदीप नाईक यांनीही उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. अर्ज दाखल केलेल्या २५ जणांपैकी ८ अपक्ष उमेदवार आहे. तर उर्वरित उमेदवार हे छोट्या संघटना, पक्षाचे आहेत. मुरजी पटेल (भाजप), ऋतुजा लटके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), निखिलकुमार ठक्कर (अपक्ष), चंद्रकांत मोटे (अपक्ष), संदेश जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया), मनोज नायक (राईट टू रिकॉल),अर्जुन मुरडकर (अपक्ष),आकाश नायक (भारत जनाधार पार्टी), मल्लिकार्जुन पुजारी (महाराष्ट्र विकास आघाडी), चंदन चतुर्वेदी (उत्तर भारतीय विकास सेना), राजेश त्रिपाठी (उत्तर भारतीय विकास सेना), संदीप नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), निकोलस अलोदा (अपक्ष), साकिब नफुर इमाम मलिक (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी),श्रीमती फर्झाना सिराज सय्यद (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी),अंकुशराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी/अपक्ष), बाळा विनायक (आपली अपनी पार्टी), वाहिद खान (अपक्ष) आणि निर्मल नागबतूला (अपक्ष), राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि(हिंदुस्तान जनता पार्टी),मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष) अशी या २५ जणांची नावे आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami