मुंबई – विज्ञानाचे गाढे अभ्यासक, प्रसिद्ध वक्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांचे आज पहाटे निधन झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर चळवळीला बसलेला हा मोठा धक्का आहे. चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सहकारी म्हणून प्राध्यापक आर्डे काम करत होते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे ते २० वर्षे संपादक राहिले. विज्ञान आणि प्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आधारवड हरपला, अशी भावना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.