संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर यंदाही भाविकांना दर्शनासाठी बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अंबरनाथ – यंदाही अंबरनाथ येथील प्रसिद्ध, प्राचीन शिवमंदिर मंगळवार १ मार्च रोजी होणार्‍या महाशिवरात्र दिनी भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यात्रेला होणारी गर्दी आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव मंदिराच्या विश्वस्तांना दिला होता. विश्वस्त मंडळाने पालिकेच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत केवळ गाभाऱ्यात विधिवत पूजा करण्याचे मान्य करत महाशिवरात्रीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त सर्वात जुनी जत्राही येथे भरत असते. जत्रेसाठी लाखो भाविक, आसपासचे विक्रेते शहरात येत असतात. त्यामुळे शहरात मोठी गर्दी होत असते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ही जत्रा रद्द करण्यात आली होती. तर मंदिरातही फक्त विधिवत पूजा करण्यात आली होती. तसेच महाशिवरात्रीला भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यावर्षी राज्य शासनाकडून अनेक निर्बंध हटवल्याने यंदा महाशिवरात्रीला मंदिरात भाविकांना प्रवेश मिळेल अशी आशा होती. मात्र, गर्दी होण्याच्या शक्यतेने हे मंदिर शिवरात्रीच्या दिवशी बंद ठेवले जाणार आहे. यंदा मंगळवार १ मार्च रोजी महाशिवरात्रीचा उत्सव असेल. त्यादिवशी शिवमंदिराकडे जाणारे अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर एक दिवस नाकाबंदी केली जाणार आहे, अशी माहिती अंबरनाथचे सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे. तर यंदा महाशिवरात्रीला केवळ मंदिरात गाभाऱ्यात फक्त पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजा केली जाणार आहे. तर मंदिरात भाविकांना मात्र प्रवेश नसणार असल्याचे मंदिराचे विश्वस्त रवी पाटील यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami