संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

अंबानींच्या घरासमोरची गाडी एटीएसने तपासण्याआधी वाझे तिथे पोहोचले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ वर्षभरापूर्वी आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या अहवालातून आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या निवासस्थानाबाहेर आढळून आल्याचे समजताच याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे गाडी एटीएसने तपासण्याआधी तिथे पोहचल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी सचिन वाझेचा पाय आणखी खोलात गेला आहे.

दरम्यान, स्फोटकांनी भरलेली कार अँटिलियाबाहेर उभी असल्याचे समजताच बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पोहोचले. या पथकाकडून शोधकार्य सुरू असताना तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे तिथे दाखल झाले. ते बराच वेळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारजवळ उभे होते. पथकाला कारची तपासणी करायची असल्याने त्यांना लांब जाण्यास सांगण्यात आले. मात्र तरीही वाझे वारंवार कारजवळ येत होते, अशी माहिती अहवालात आहे.

सचिन वाझेंनी बॉम्ब निकामी करण्यासाठी आलेल्या पथकाच्या कामात वारंवार हस्तक्षेप केला. स्फोटकं आढळून आल्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना दूर उभे राहण्यास सांगितले. तो प्रोटोकॉलचा भाग होता. मात्र वाझे सातत्याने कारजवळ येत होते. यामुळे तुमच्यासह इतरांच्याही जीवाला धोका असल्याचे वाझेंना अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र तरीही वाझेंनी अनेकदा प्रोटोकॉल मोडला, असे एटीएसने अहवालात म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami