नवी दिल्ली – मुकेश अंबानी आणि भाजप यांचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची केंद्राने नेहमीच काळजी घेतली आहे आणि अंटालिया प्रकरणानंतर तर मुकेश अंबानींच्या सुरक्षेविषयी केंद्र सरकार अधिकच सतर्क आहे. म्हणूनच त्यांच्या सुरक्षेच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्राने आक्षेप नोंदवला आहे.
मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्र सरकारने आक्षेप नोंदवला आहे. एवढेच नाही तर त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्र सरकारने आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केंद्राने केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाना 28 जूनला याबाबत सुनावणी घेण्यात येणार आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना गृह मंत्रालयाकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती.