संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अंबानी आणि ठाकरे यांची भेट तब्बल ३ तास दोघांमध्ये चर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- राज्यातील राजकारण सध्या ऐन दिवाळीतही ढवळून निघाले आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन नेते एकाच मंचावर दिसले. मुंबईतील शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सवाचे शिंदे-फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे राज्यात नव्या महायुतीचे संकेत निर्माण झाले आहेत.तर दुसरीकडे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी काल शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
अनंत अंबानी आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली.यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.रात्री ८ वाजून २० मिनिटांनी अनंत अंबानींचा ताफा मातोश्रीवर दाखल झाले.रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अंबानी मातोश्रीवरुन बाहेर पडले. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.मात्र, देशातील एका बड्या उद्योगपतीचा मुलगा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आल्याने या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami