संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

अंबानी कुटुंबीयांना अज्ञाताकडून पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स हॉस्पीटलला उडवण्याबरोबर अज्ञाताने अंबानी कुटुंबाला देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आज दुपारी हॉस्पीटलच्या लँडलाईन नंबरवर धमकीचा फोन आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मुंबई पोलिसांकडून हा कॉल नेमका कुठून आला याचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्राबाहेररुन हा फोन आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे संबंधित आरोपीचे कॉल लोकेशन ट्रेस केले जात आहे.

सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाइन नंबरवर दुपारी 12:57 वाजता एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. यावेळी अज्ञात व्यक्तीने रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश आणि अनंत अंबानी यांनीही जीवे मारण्याची धमकी दिली. फोन करणार्‍याने हॉस्पिटलही बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली. या प्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलिसांनी इतर सुरक्षा यंत्रणांसह या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यातही अंबानी कुटुंबियांना धमकीचा फोन आला होता. यापूर्वी 15 ऑगस्टलाही रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये असाच फोन आला होता. त्या व्यक्तीने हॉस्पिटलच्या डिस्प्ले नंबरवर आठ धमकीचे कॉल केले होते. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली होती. त्याची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचे पोलिसांनी म्हटले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami