संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

अंबाबाई मंदिरातील दानपेट्या तुडुंब; ९ पेट्यामध्ये १ कोटी ६० लाखांची रोकड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्या भरल्यामुळे उघडण्यात आल्या असून काल संध्याकाळी ९ पेट्यांमधील देणगीचे मोजकाम पूर्ण झाले. त्यातून तब्बल १ कोटी ६० लाख ६४ हजार ६४३ रुपये गोळा झाले असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी यांनी सांगितले आहे. या दानपेटीमध्ये दहा, वीस, पन्नास आणि शंभर रुपयाच्या नोटांचे प्रमाण जास्त होते. तसेच १ रुपये, २ रुपये व ५ रुपयांची नाणी देखील भरपूर प्रमाणात सापडल्या आहेत.

मंदिर प्रशासनाचे ४० कर्मचारी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ३ कर्मचाऱ्यांनी या नोटा मोजून बंडल करून ठेवले. अंबाबाई मंदिर आणि परिसरात एकूण १२ ते १५ दानपेट्या आहेत. यातील दर्शन रांगेतील दानपेट्या उघडण्यात आल्या होत्या. कोरोना संसर्गात काही महिने मंदिर बंद होते. मात्र संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने काही निर्बंध घालत राज्यातील मंदिराची दारे पुन्हा भक्तांसाठी उघडली. त्याप्रमाणे कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी ई पास द्वारे दर्शनासह नियमावलीनुसार भक्तास दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. मात्र भक्तांना आई अंबाबाईच्या दर्शनाला मंदिरात जाताना ओटी, साडी, नारळ अश्या अनेक वस्तू मंदिरात घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली. यामुळे भक्त दर्शन घेत असताना भक्ती म्हणून दान पेटीमध्ये पैसे टाकू लागले. दिवाळीच्या अगोदरच उघडण्यात आलेले दक्षिण पेटी ही दिवाळी आणि ख्रिसमसच्या काळात आलेल्या पर्यटक आणि भाविकांनी भरभरून देणगी टाकत सर्व पेट्या नोटांनी भरून टाकल्या.काही पेटीमधून नोटा बाहेर येऊ लागल्याने त्यावर चिकटपट्टी लावून झाकले असल्याचे नाईकवडी यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami