संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

अकराच्या पेपरला साडेनऊला उपस्थित रहा, थर्मल स्क्रिनिंग होणार; विद्यार्थ्यांसाठी नियमावली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई –  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक इयत्तांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, परीक्षार्थींना दीड तास आधीच परीक्षा केंद्रावर जावं लागणार आहे. कराण कोरोना प्रतिबंधक नियमांतर्गत विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग करूनच त्यांना परीक्षेला बसता येणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा आणि परीक्षा ऑनलाईन झाल्या. मात्र, ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्यामुळे यंदा कोरोनाचा वेग कमी असल्याने परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरवले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काळजी घेऊन परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दीड तास आगोदर म्हणजे त्यांना साडेनऊ वाजता त्यांच्या परीक्षा केंद्रावर पोहचणं गरजेचं आहे. कारण तिथं गेल्यानंतर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग तपासणी करण्यात येईल. तपासणी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांला गेटवरून परीक्षा केंद्रात सोडण्यात येईल. तिथं ज्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत शंका उपस्थित होईल त्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. तसेच त्याबाबत तिथलं केंद्र प्रमुख निर्णय घेतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami