अकोल्यात कंपनीला आग; २ होरपळून ठार, ३ जखमी

fire, flames, red-2821775.jpg
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

अकोला – अकोला-खामगाव रोडवरील रिधोराजवळच्या ईगल इन्फ्रा कंपनीला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. त्यात २ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अकोल्यातील रिधोराजवळ ईगल इन्फ्रा ही कंपनी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत आहे. या कंपनीत बुधवारी सायंकाळी डांबराच्या टाकीचा स्फोट होऊन आग लागली. आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनेक तास आगीशी झुंज देऊन ती नियंत्रणात आणली. मात्र या दुर्घटनेत आतिफ खान आणि संजय पवार हे दोन कामगार ठार झाले. टाकीला गळती लागल्यामुळे तिच्या वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

Close Bitnami banner
Bitnami