संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

अक्कलकोटच्या बोरगावात ढगफुटी! गावांचा संपर्क तुटला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर- राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला असताना सोलापुरात मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे.सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव येथे काल दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यामुळे गावातील अनेकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले तर अनेक गावांचा संपर्क तुटला. तसेच शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. सोलापूरच्या बोरगावमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे कुरनुर धरणातून 600 क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे.

आश्‍लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोसळगाव, किणीवाडी यांसह आदी गावात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे हे दोन तलाव 100 टक्के भरले आहेत. घोळसगाव येथील तलाव 100 टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. बोरगाव येथील पीर राजेबागसवार साठवण तलाव 100 टक्के भरले असून बोरगावचा ओढा दुथडी भरून वाहत आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, बादोले, वागदरी, शिरवळ सापळे आदी भागात काल बुधवारी दुपारी दोन वाजता पाऊस सुरू झाला. या मुसळधार पावसामुळे ऊस, मुग, उडीद, सोयाबीन, तूर आदी पिके खराब होण्याच्या मार्गावर आहेत. कामात व्यस्त असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami