संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अखिलेश यादव सलग तिसऱ्यांदा सपाचे अध्यक्ष

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ – समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून आज लखनऊच्या रमाबाई आंबेडकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या समाजवादी पार्टीच्या महाधिवेशनच्या शेवट्याच्या दिवशी महासचिव राम गोपाल यादवांनी त्यांची अध्यक्षपदी अखिलेश यादवांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांचे अभिनंदन करून पक्षासाठी लढत राहण्याची ग्वाही दिली.
या अधिवेशात अखिलेश यादवांनी सांगितले की, ‘मला पंतप्रधान बनण्याची हौस नाहीय. मात्र देशाला तुकडे करणाऱ्या शक्तीविरोघात मला लढाईचे आहे. भाजप सरकारला हरवण्यासाठी मी विरोधक म्हणून महत्वाची भूमिका बजावणार आहे.`
1 जानेवारी 2014 रोजी त्यांना पहिल्यांदाच मुलायमसिंह यादव यांच्या जागी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2017 मध्ये आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती. अखिलेश यादव यांच्या आधी त्यांचे वडील मुलायम सिंह यादव हे पक्षाच्या स्थापनेपासून अध्यक्ष होते. याआधी बुधवारी सपाच्या प्रांतीय अधिवेशनात नरेश उत्तम पटेल यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ऑक्टोबर 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami