मुंबई – राज्याच्या राजकारणात भूकंप करणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे अखेर आज पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. आज संध्याकाळी सात वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या निकालानंतर साधारण ४० आमदारांसह बंड केलेलं शिवसेना नेते एकनाथ शिंदे सध्या गुवाहटी येथे असून या पत्रकार परिषदेत शिंदे नेमका कोणता बॉम्ब फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.