संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

अखेर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या
‘आदिपुरुष’ची रिलीज डेट पुढे ढकलली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*दिगदर्शक ओम राऊत यांची माहिती

मुंबई :साऊथ स्टार प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या टीझरनंतर सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार खिल्ली उडवली गेली. यासोबतच रामायणावर आधारित या चित्रपटात तथ्यांशी छेडछाड करण्यात आल्याची चर्चाही होती. अयोध्येत पूर्ण थाटामाटात प्रदर्शित झालेल्या या टीझरवर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आता चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. व्हीएफएक्सबद्दल सतत विरोधाला सामोरे जाणाऱ्या या चित्रपटाच्या टीमने सध्यातरी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी चित्रपटाचे दिगदर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. आदिपुरुष आता १६जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. संपूर्ण भारताला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमचे सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला यासाठी नेहमीच प्रेरणा देत आले आहे आणि यापुढेही देत ​​राहतील.’असे त्यांनी म्हटले आहे. तर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत अधिकृत निवेदन जारी करत निर्मात्यांनी म्हटले, ‘आदिपुरुष हा केवळ एक चित्रपट नाही, तर प्रभू श्री रामावरील आमची भक्ती आणि आमच्या गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीशी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आदिपुरुषच्या निर्मितीशी निगडित असलेल्या लोकांनी प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव देण्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा. तसेच ५०० कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला जात असून भारतीय प्रेक्षकांना त्यांच्या संस्कृतीशी संबंधित कथेसह एक अप्रतिम दृश्य अनुभव देणार असल्याचा निर्मात्यांकडून दावा करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami