संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

अखेर सफाळे रेल्वे स्थानकात
सरकत्या जिन्याचा शुभारंभ !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पालघर – पश्चिम रेल्वे मार्गावरील सफाळे स्थानकामध्ये एक्सलेटर म्हणजेच सरकत्या जिन्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी मागील दोन वर्षांपासून सफाळे स्टेशन कमिटी करत होती.अखेर ही मागणी रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली आहे. या रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वर या सरकत्या जिन्याचा शुभारंभ करण्यात आला. स्टेशन कमिटीचे सदस्य प्रशांत किणी यांच्या हस्ते जिन्यांचे उद्‍घाटन करण्यात आले.

यावेळी उद्घाटनप्रसंगी सफाळे स्टेशन कमिटीचे अध्यक्ष जतीन कदम, उपाध्यक्ष पंकज म्हात्रे, सदस्य प्रशांत किणी, प्रतिभा कदम,अक्षय सत्पाळकर, स्टेशन मास्तर चुनीलाल अगलेसर,रेल्वे संघटनेचे अरुण घरत,तसेच रेल्वे सुरक्षा पोलिस, प्रवासी वर्ग उपस्थित होते. सफाळे रेल्वेस्थानकात दररोज सुमारे २० ते २५ हजार प्रवाशांची ये-जा असते. ही प्रवाशांची गर्दी वाढतच चालल्याने या स्थानकात ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व माल वाहतूक करणारे यांच्यासाठी सरकत्या जिन्यांची आवश्यकता भासत होती. तशी मागणी मागील दोन वर्षांपासून सफाळे स्टेशन कमिटी रेल्वे प्रशासनाकडे करत होती. अखेर या कमिटीच्या मागणीला यश आले. रेल्वे प्रशासनाने सफाळे स्टेशन कमिटीच्या कार्यकारिणीला बोलावून उद्‍घाटन करण्याची विनंती केली आणि स्टेशन कमिटीचे सदस्य प्रशांत किणी यांच्या हस्ते जिन्यांचे उद्‍घाटन पार पडले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या