संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

अखेर सातारा वासोटा किल्ला अन् बोटींग पर्यटकांसाठी सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे काही कडक निर्बंध पर्यटनस्थळांवर घातले गेले होते. त्यामुळे कोरोनामुळे दोन महिन्यांपासून वासोटा किल्ल्यावरील पर्यटन बंद होते. मात्र बामणोली परिसरातील बोटमालक, चालक व अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. अशावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधून वासोट्यावरील पर्यटन, बोटिंग तातडीने पुन्हा सुरू करण्याची सूचना सोमवारी केली. त्यांनतर चव्हाण यांनी मंगळवारपासून वासोट्यावरील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, बामणोलीतील भैरवनाथ बोट क्लबचे अध्यक्ष धनाजी संकपाळ यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन पर्यटन व बोटिंग सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांनतर शिवेंद्रसिंहराजे यांनी वनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही महाबळेश्वरमध्ये पर्यटन सुरु आहे. इतर ठिकाणीही सर्व व्यवसाय सुरू असताना, वासोट्यावरील पर्यटन बंद ठेवल्याने बामणोली परिसरातील बोटचालक, मालक व इतर व्यावसायिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे बामणोली भागातील बोटिंग व इतर व्यवसाय पर्यटनावर अवलंबून असल्याचे सांगत पर्यटनाची परवानगी त्वरित द्यावी, अशा सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली होती. त्यानंतर चव्हाण यांनी मंगळवारपासून पर्यटन सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे सांगितले. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशीही संपर्क साधला. वासोटा पर्यटन आणि बोटिंग सुरू होत असून महसूल विभागाने व्यावसायिकांना सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
शेखर सिंह यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने वासोट्यावरील पर्यटन आणि बोटिंगचा मार्ग खुला झाला आहे. याबद्दल बोट क्लबच्या सदस्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami