संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

अखेर 45 दिवसांनी लोमटे महाराज गजाआड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उस्मानाबाद- स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी फरार असलेल्या महाराजाला अखेर 45 दिवसांनी पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.

आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने लोमटे महाराजाने महिला भक्ताचा विनयभंग केला असल्याची तक्रार एका महिलेने 28 जुलै 2022 रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात केली होती. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर अखेर स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होण्याची चाहूल लागताच महाराज फरार झाला होता. दरम्यान, महाराजाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांचा कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराज यांचा मठ आहे. या मठात लोमटे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्त येत असतात. एवढचं नाही तर महाराज यांचा राज्यभर मोठा भक्तवर्ग असून या मध्ये विविध पक्षांचे बडे नेतेही महाराज यांचे भक्त आहेत. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराज यांची ख्याती आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami