संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

अग्निवीर भरती चाचणीत तरुण उमेदवाराचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद :अग्निवीर भरतीसाठी कन्नड तालुक्यातून दोन सख्खे भाऊ औरंगाबदेत आले होते. मैदानी चाचणीदरम्यान धावत असताना अवघे पाच फूट अंतर शिल्लक असतानां, एक भाऊ मैदानात कोसळला त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली असल्याचे समजते. २० वर्षीय करण नामदेव पवार असे मृत तरुण उमेदवाराचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील करण आणि सागर हे दोन सख्खे भाऊ अग्निवीर भरतीसाठी बुधवारी संध्याकाळी औरंगाबदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दाखल झाले होते. रात्रीच्या दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी करणने मैदानाचे तीन चक्कर पूर्ण केले होते. चौथे आणि शेवटचे चक्कर पूर्ण करण्यासाठी अवघे पाच फूट अंतर शिल्लक असताना करण अचानक मैदानात कोसळला. त्याला रात्री दीडच्या सुमारास तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून करणला मृत घोषित केले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेमके तरुणाचा मृत्यू कसा झाला ते अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ‘माझा सहारा गेला. माझ्या लहान मुलाला तरी नोकरीत सामावून घ्या, अशी विनंती मृत तरुणाचे वडील नामदेव पवार यांनी केली आहे. तर आम्ही दोघेही भरती होण्यासाठी औरंगाबदेत आलो होतो. घरून आणलेली भाकर खाल्ली. भाऊ म्हणाला होता आपण दोघेही भरती होऊ आणि देशसेवा सोबत करू. पण शेवटच्या राउंडचे काही फूट अंतर शिल्लक होते. माझ्या डोळ्या देखत माझा मोठा भाऊ गेला. मला आई नाही, वडील आजारी असतात आता मी काय करू, असे मृत तरुणाच्या भावाने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami