*१३५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक नुकसान
नवी दिल्ली: २४ जानेवारीपर्यंत अदाणी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. अदानी समूहाचे १३५ अब्ज डॉलरपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक श्रीमंतांत तिसऱ्या स्थानावर पोहोचलेले गौतम अदानी सध्या २५ व्या स्थानापर्यंत खाली आले आहेत.
हिंडेनबर्गच्या अहवाल आल्यानंतर अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन निम्म्यावर आले.पहिल्यांदा गौतम अदाणी टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. आता टॉप-20 यादीतून बाहेर पडलेत. हिंडेनबर्ग अहवालाने अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीवरही गंभीर परिणाम झाला आहे.
कारण, वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांची संपत्ती ७१ अब्ज डॉलरपेक्षा कमी झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये सूचीबद्ध ५०० श्रीमंत लोकांमध्ये अदानी यांच्या संपत्तीची सर्वांत वेगाने घसरण झाल्याचे पाहायला मिळते. गेल्या आठवड्यात मंगळवारी (14 फेब्रुवारी), गौतम अदानींची एकूण मालमत्ता 52.4 अब्ज डॉलर होती. अवघ्या तीन दिवसांत त्यांची संपत्ती सुमारे 3 अब्ज डॉलरने कमी झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनअर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी यांची नेट वर्थ 49.1 अब्ज डॉलर आहे.