संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

अदानीचा इस्रायल कंपनीशी करार! 5जी, शेती तंत्रज्ञान विकसित करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली-अदानी समूहाने इस्त्रायल इनोव्हेशन अ‍ॅथॉरिटीसोबत करार झाला असल्याची माहिती अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने दिली. या करारात अत्याधुनिक इनोव्हेशन प्लॅटफॉर्मची निर्मिती सामील आहे. या करारानंतर अदानी एंटरप्रायझेस इस्त्रायली स्टार्टअप्सकडून तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करून देऊ शकणार आहे.

या करारामुळे अदानी समूह हवामान बदल, सायबर, एआय, आयओटी, 5जी आणि अ‍ॅग्रीकल्चरसाठी टेक्नॉलॉजी विकसित करणार आहे. हे सर्व अदानी समूहाचे मूळ व्यवसाय असून इस्रायल इनोव्हेशन अ‍ॅथॉरिटी ही सार्वजनिकरित्या अनुदानित एजन्सी आहे, जी इस्रायलच्या इनोव्हेशन धोरणांवर देखरेख करत आहे. इस्रायल इनोव्हेशन अ‍ॅथॉरिटीला असेही म्हणतात. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात, नवीन विचार पुढे नेण्यासाठी सशर्त अनुदान प्रदान करते. भविष्यातील टेक्नॉलॉजीचा पाया घालण्यासाठी पायाभूत सुविधा देखील प्रदान करते. हे सहकार्य गेल्या सहा वर्षांत इस्रायलमध्ये अदानीने स्थापन केलेल्या विद्यमान भागीदारी आणखी वाढवेल, असे एका निवेदनात म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami