गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन या कंपनीने तीन वर्षात गुंतवणूकदारांना सात हजार टक्के परतावा दिला आहे. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी या कंपनीचा शेअर ३० रुपये होता. मात्र आता हा शेअर २१०० रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. अलीकडेच अदानी ग्रीनच्या मार्केट कॅपने ३ लाख कोटींचा टप्पा पार केला. यासह अदानी ग्रीन कंपनी आयटीसी आणि टायटन यांपेक्षाही मोठी कंपनी बनली आहे.
२२ जून २०१८ रोजी पहिल्यांदा या कंपनीचा शेअर सूचीबद्ध झाला होता. तेव्हा या शेअरची किंमत अवघी २९.४५ पैसे होती. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०१९ रोजी हा शेअर ३० रुपये झाला. एकीकडे शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू असताना दुसरीकडे अदानी ग्रीन कंपनीचा शेअर वाढला आहे. गेल्या चार दिवसात तर या कंपनीच्या शेअरमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या या कंपनीचा शेअर २१२८ अंशावर ट्रेड करत आहे.
अदानी ग्रीनच्या कंपनीत ३ वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तींने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आताच्या घडीला त्या व्यक्तीला ७० लाखांपर्यंत परतावा मिळू शकला असता. मुंबई शेअर बाजारात या अदानी ग्रीन कंपनी २१२८ अंशांचा आपला ऑल टाइम उच्चांकांवर आहे. एकीकडे शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू असताना, अदानी ग्रीनचा शेअर तेजीत होता. केवळ ४ दिवसांत या शेअरने ११ टक्क्यांची वाढ नोंदवली.
आतापर्यंत अदानी ग्रीन कंपनीने तब्बल ७ हजार टक्क्यांचा परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात अदानी ग्रीन सर्वांत मोठी कंपनी आहे.