संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

अनंतनाग प्रसूती रुग्णालयात सिलिंडर स्फोट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर- आठ दिवसांपूर्वीच जम्मूत सरकारी महाविद्यालयाला आग लागली असल्याची घटना घडली असतानां, आता दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील शायरबाग येथील मॅटर्निटी आणि चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला असल्याची घटना घडली असल्याचे वृत्त समोर आले आहे. मंगळवारी झालेल्या या अपघातात 2 मुलांसह 10 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट काऊंटरजवळील गॅस सिलिंडरमध्ये गळती झाल्याने हा स्फोट झाला. दरम्यान रुग्णालयातील काही कर्मचारीही जखमी झाले आहेत. तसेच, जखमींना उपचारासाठी जीएमसी अनंतनाग येथे पाठवण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दोन मुलांचाही समावेश असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे. अनंतनागचे डॉक्टर तारिक कुरेशी यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागमध्ये जखमी झालेल्या 10 जणांवर उपचार सुरू आहेत. सर्वांना किरकोळ दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील रुग्णालयात हा गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असून, एमसीसीएच अनंतनागच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, तिकीट विभागातील हीटिंग गॅसच्या गळतीमुळे हॉस्पिटलमध्ये हा स्फोट झाला आहे. या घटनेत काही कर्मचार्‍यांसह अनेक जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व जखमींना उपचारासाठी जीएमसी अनंतनागमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी 22 फेब्रुवारीला जम्मूतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आग लागली होती. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami