संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 02 April 2023

अनिल अंबानी यांची दिवाळखोर कंपनी
रिलायन्स कॅपिटलचा ई-लिलाव होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भारताचे प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल ही कंपनी कर्जात बुडाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड बरखास्त केले आणि त्याविरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली. अशा परिस्थितीत अंबानींच्या रिलायन्स कॅपिटल्सचा या महिन्यात ई-लिलाव करण्याची तयारी केली हे. या महिन्याच्या अखेरीस अनेक टप्प्यांत बोली लावली जाण्याची शक्यता असून अनेक कंपन्यांनी रिलायन्स कॅपिटलला खरेदी करण्यासाठी तयारीत आहेत. पिरामल एंटरप्रायझेस-कॉस्मी फायनान्शियल होल्डिंग्ज, हिंदुजा ग्रुप, टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स आणि ऑक्ट्री कॅपिटल या कंपन्या मैदानात आहेत बोलीच्या अनेक फेऱ्या होतील आणि सर्वाधिक बोली लावणाऱ्याला अंबानींची रिलायन्स कॅपिटलची मालकी मिळेल. येईल. अनिल अंबानींची रिलायन्स कॅपिटल खरेदी करण्यासाठी पिरामल एंटरप्रायझेस-कॉस्मी फायनान्शियल होल्डिंग्सने सर्वाधिक ५,२३१ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. ई-लिलावासाठी ही मूळ किंमत असू शकते. व्यतिरिक्त, हिंदुजा ग्रुप, टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स आणि ओक्ट्री कॅपिटल यांनीही रिलायन्स कॅपिटल आणि त्याच्या सहयोगी कंपन्यांना खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे.
१९ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत निविदा प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. पहिल्या फेरीत बोली लावणाऱ्यांना मूळ किमतीपेक्षा किमान १,००० कोटी रुपयांची अधिक बोली लावावी लागेल. दुसऱ्या फेरीत, बोलीदारांना पहिल्या फेरीतील सर्वाधिक बोलीपेक्षा किमान ७५० कोटी रुपयांची अधिक बोली लावतील. त्याचप्रमाणे, तिसर्‍या फेरीत बोलीदारांना दुसऱ्या फेरीतील सर्वाधिक बोलीपेक्षा किमान ५०० कोटी रुपयांची अधिक बोली लावावी लागेल. रिलायन्स कॅपिटलला कर्ज देणाऱ्यांनी मंगळवारी दोन पर्यायांवर चर्चा केली. बंद बोली (क्लोज बिड) आमंत्रित करणे किंवा ठराव दाखल करणार्‍या कंपन्यांमध्ये ई-लिलाव आयोजित करण्याचा समावेश होता. पण बँकांनी दुसरा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या