मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जामीन मागितला आहे. पण, त्यांच्या या जामिनाला आता अभिनेत्री केतकी चितळेने विरोध केला आहे. केतकीच्या या याचिकेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जामीन अर्ज केला आहे. मात्र देशमुखांच्या जामीन अर्जाला केतकी चितळेने विरोध केला आहे. म्हणे, अनिल देशमुख यांना जामीन देवू नये. जामीन दिल्यास ते फरार होतील’, फरार झाले की ते पुन्हा मिळून येणार नाहीत, असा दावाच केतकीने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे, केतकी चितळेवर राजकीय दबावाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.