संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

अनिल देशमुखांच्या सीएच्या घरावर सीबीआयची धाड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – राज्याचे माजी गृहमंंत्री अनिल देशमुखांचा सीए विशाल खडवालच्या नागपुरातील घरावर सीबीआयने आज सकाळी सात वाजता अचानक धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सीबीआयच्या कारवाईमुळे 100 कोटी वसुलीप्रकरणी तुंरुगात असलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

आज सकाळी दोन गाड्यांतून सीबीआय सात ते आठ अधिकारी नागपुरच्या कोरडी ग्रीन लेवरेज परिसरात दाखल झाले आणि अनिल देशमुखांच्या सीएच्या धरावर अचानक धाड टाकून सर्च ऑपरेशन सुरु केले. या धाडीत सीबीआय अधिकार्‍यांनी कागदपत्र आणि डिजीटल पुरावे आपल्या ताब्यात घेतले. 100 कोटी वसुलीप्रकरणी सीबीआयची कारवाई अद्यापही सुरुच असल्यामुळे देशमुखांना झटका बसला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami