संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

अनिल देशमुख, नवाब मलिकनंतर अनिल परबांचा नंबर; किरीट सोमय्यांचा दावा

anil parab and kirit somayya
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांवर ईडीने चौकशीसाठी बोलावले. तर काहींना अटक झाली आहे. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता नवाब मलिकांवर कारवाई झाली. आता पुढचा नंबर अनिल परब यांचा असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात खरंच अनिल परबही अडकणार का? हे पाहावे लागणार आहे.  

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक जेलमध्ये. अनिल परब यांना आता हिशोब द्यावा लागणार.

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी किरीट सोमय्यांसह अनेक भाजप नेत्यांना आव्हान दिलं होतं. तसेच, एनसीबीच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. अशातच आता मंत्री नवाब मलिक यांचं कारस्थान हळूहळू जनतेसमोर येत आहे, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी नवाब मलिकांवर टीका केली आहे. 

दरम्यान, आज सकाळीच ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. त्यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले. त्यांची आठ चौकशी केली आणि चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपवार असताना अटक झालेले दुसरे मंत्री आहेत. दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याने त्यांना अटक झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami