संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांना कोर्टाचा तात्पुरता दिलासा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलगा सलील देशमुख यांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. कोर्टात हजर राहण्यासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ईडीने दोन वेळा समन्स बजावले होते.पीएमएलए कोर्टाने ४ आठवड्याची मुदत सलील यांना दिली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सलील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने जो एनफोर्समेंट केस इनफॉरमेशन रीपोर्ट नोंदवला आहे. त्यात अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे कुटुंबीय देखील आरोपी दाखवण्यात आले आहेत. यामध्ये त्यांचे ज्येष्ठ पुत्र सलील हे आरोपी क्रमांक १७ आहेत. तपास यंत्रणेने याप्रकरणी चौकशीसाठी वारंवार सलील यांना समन्स बजावले होते. पण ते कधीही आपला जबाब नोंदवायला तपास यंत्रणांसमोर हजर झालेले नाहीत.त्यानंतर जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेले तेव्हा कोर्टाने देखील त्यांना दोन वेळा कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तिसऱ्या समन्सनंतर वॉरंट निघण्याची शक्यता असल्याने त्यांनी आपल्या वकिलांमार्फत कोर्टात विनंती अर्ज सादर करत कोर्टात हजर राहण्यासाठी मुदत मागितली. कोर्टाने त्यांचा हा विनंती अर्ज मान्य करत चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami