संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात अँजिओग्राफी होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात होते. मात्रअनिल देशमुख हे हृदयविकाराने त्रस्त आहेत. पीएमएलए न्यायालयाने अनिल देशमुख यांची खासगी रुग्णालयात अँजिओग्राफी करण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांना आज जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हृदयविकाराच्या त्रासामुळे अँजिओग्राफी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खाजगी रुग्णालयात उपचार मिळावेत, अशी मागणी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला . त्यानंतर अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगातून जसलोक रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, ईडीने केलेल्या कारवाईत अनिल देशमुख यांन ४ ऑक्टोबर २०२२ रोजी जामीन मंजूर करण्यात आला. परंतु सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना अद्याप जामीन नाही. सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर करावा, यासाठी अनिल देशमुख प्रयत्न करत आहेत. शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती. यातच त्यांचे गृहमंत्रीपद गेले. ईडीने या प्रकरणात ईसीआयआर दाखल केला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami