अनिल देशमुख यांच्याविरोधात माझ्याकडे ऐकिव माहिती, ठोस पुरावे नाहीत- परमबीर सिंग

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात फरारी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे अनिल देशमुख यांच्यावरील गुन्ह्याबाबत जी माहिती आहे ती सगळी एकीव आहे. त्यामुळे त्यांना साक्षीदार म्हणून आयोगासमोर हजार करण्यात काहीच अर्थ नाही. असा मोठा खुलासा आज परमबीर यांच्या वकिलाने चौकशी आयोगासमोर केल्याने अनिल देशमुख प्रकरणाला वेगळीच कलाटणी लागली आहे .

अनिल देशमुख यांच्या वरील आरोपांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने जो चौकशी आयोग नेमला आहे त्यांच्यासमोर आज परमवीर सिंग यांचे वकील बाली यांनी सांगितले की परमबीर सिंग यांच्याकडे असलेली सर्व माहिती एकीव आहे . त्यांनी केलेले सर्व आरोप हे एकीव माहितीच्या आधारे आहेत त्यांच्याकडे थेट अशी कोणतीही माहिती नाही. त्यांना इतरांनी जे सांगितले तेच त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना साक्षीदार म्हणून आयोगासमोर उभे करण्यात काहीच अर्थ नाही. परमबीर सिंघ यांच्या वकिलांच्या या खुलाशामुळे खंडणी प्रकरणातून अनिल देशमुख यांना एक प्रकारे क्लीन चीट मिळाली आहे.

दरम्यान परमबीर सिंग यांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्रले असले तरी तरी अद्याप त्यांचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही . त्यामुळे त्यांच्या घरावर ३० दिवसात आयोगासमोर साक्षीसाठी येण्याची नोटीस लावण्यात आलेली आहे. परमबीर सिंग भारतातच आहेत असे सांगण्यात येत असले तरी जोवर ते हजर होत नाहीत तोवर काहीच स्पष्ट होणार नाही असेच वाटत असताना आज त्यांच्या वकिलाने चौकशी आयोगाच्या समोर जो खुलासा केला आहे . त्या खुलाशामुळे अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे निराधार आहेत आणि त्याबाबत परमवीर सिंग यांच्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे स्पस्ट झाल्याने १०० कोटी खंडणीच्या आरोपातून एक प्रकारे देशमुख यांना क्लीनचिट मिळाली आहे .

Close Bitnami banner
Bitnami