संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

अन्नू राणीची वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

यूजीन – ‘वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप’ स्पर्धेत भारतीय महिला भालाफेकपटू अन्नू राणी हिने ५९.६० मीटर भालाफेक करत अंतिम फेरी गाठली आहे. ओरेगॉनच्या यूजीन येथे झालेल्या पात्रता फेरीतील दोन गटांतून सर्वोत्तम आठ भालाफेकपटू अंतिम फेरीसाठी निवडले गेले. त्यात अन्नूने स्थान पटकावले आहे. तिची ही तिसरी वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप आहे.

पात्रता फेरीत अन्नूने आपल्या पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ५५.३५ मीटर भाला फेकला. त्यामुळे तिचे आव्हान संपुष्टात येणार असे वाटत होते. मात्र तिसऱ्या प्रयत्नात तिने ५९.६० मीटर भाला फेकून स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले. तिचा भाला ६० मीटर निशाणाच्या केवळ ४० सेंटीमीटर मागे राहिला. आता अन्नू शनिवारी सकाळी ६.५० वाजता होणाऱ्या अंतिम फेरीत लढताना दिसेल.

२९ वर्षीय अन्नू राणीच्या नावावर ६३.८२ मीटर भालाफेकीचा राष्ट्रीय विक्रम आहे. मे महिन्यात जमशेदपूर येथे झालेल्या इंडियन ओपन भालाफेक स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावत राष्ट्रीय विक्रम केला होता. तसेच आता ती सलग दुसऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami