पिंपरी- भाजपाचे माजी नगरसेवक सागर आंगोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. पिंपळे गुरव येथील माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर ही हाणामारी झाली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मतदारसंघात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र तरी देखील पिंपळे गुरव येथील माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर भाजप समर्थक माजी नगरसेवक सागर आंगोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक गणेश जगताप यांच्यात हाणामारी झाली.
मतदान केंद्र परिसरात १०० मीटर हद्दीत थांबणे, आणि एकमेकांकडे खुन्नस देऊन बघण्यावरून हा वाद झाला. हा वाद झाल्यानंतर या मतदान केंद्रावर अधिक पोलिस बंदोबस्त वाढव असून दोन्हीही समर्थक सांगवी पोलीस चौकीत गेले असून एकमेकांविरोधात तक्रारीत देण्याचे येत आहे.