संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

अफगाणिस्तानचे काबुल पुन्हा हादरले! मशिदीतील स्फोटात २१ ठार! ६० जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहर पुन्हा स्फोटाने हादरले. उत्तर काबुलच्या मशिदीत सायंकाळी नमाजाच्या वेळी हा शक्तीशाली स्फोट झाला. त्यात २१ जण ठार झाले असून ६० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती काबुलच्या सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी दिली. स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

कट्टरपंथी तालिबानने गेल्यावर्षी अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यानंतर तेथील अल्पसंख्यांक शिया मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या मशिदीमध्ये आतापर्यंत अनेक स्फोट झाले. इसिसने हे स्फोट घडवले होते. उत्तर काबुलच्या मशिदीत बुधवारी सायंकाळी नमाजासाठी नागरिक जमा झाले होते. त्यावेळी मशिदीत शक्तिशाली स्फोट झाला. तो इतका जबरदस्त होता की, त्यामुळे मशिदीच्या आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्याही काचा फुटल्या. या स्फोटात मशिदीतील २१ जण ठार झाले, तर ६० पेक्षा अधिक जखमी झाले. त्यातील २७ अत्यावस्थ आहेत. जखमींमध्ये ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. स्फोटातील जखमींना त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. त्याचा विजयी सप्ताह साजरा केला जात आहे. असे असतानाच मशिदीत झालेल्या शक्तिशाली स्फोटाने काबुल शहर पुन्हा हादरले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami