काबुल – अफगाणिस्तानला आज मंगळवारी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले.तसेच ताझिकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानचा भूकंप ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.भूगर्भात १० किमीवर या भूकंपाचे केंद्र होते. यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.
तुर्कीमध्ये ६ फेब्रुवारी रोजी शक्तीशाली भूकंप झाला होता. यामध्ये ५० हजार लोक ठार झाले होते.यामध्ये अनेक शहरे उद्ध्वस्त झाली होती.गेल्या काही दिवसांपासून आशिया खंडात भूकंपाचे प्रमाण वाढले असून रोज कोठे ना कोठे भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत.आज सकाळी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर अंतरावर होता. ताझिकिस्तानमध्येही ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला.काल सोमवारी सायंकाळी तुर्कस्तानमध्ये पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंप झाला.त्याची रिश्टर स्केल तीव्रता ५.६ इतकी होती.