संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

अफझलखानाच्या वधाचा भव्य पुतळा
प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारणार !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – सातारा जिल्ह्यातील प्रतापगड पायथ्याजवळील अफजलखानच्या कबरीजवळील अतिक्रमण नुकतेच प्रशासनाच्यावतीने हटवण्यात आले. यानंतर आता राज्य सरकारने शिवप्रेमींच्या मागणीनुसार आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अफजलखानाच्या कबरीजवळ खानाचा कोथळा बाहेर काढत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
राज्य सरकारने नुकतेच शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत प्रतापगडावरील अफजलखानच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडले. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर सर्व स्तरातून आनंद व्यक्त करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने अफजलखानाच्या कबरीजवळ ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे त्या ठिकाणी आता खानाचा कोथळा बाहेर काढत असणारा देखावा असलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून हा इतिहास येणारे पर्यटक आणि आताच्या पिढीलाही याची सहजपणाने माहिती उपलब्ध होईल. प्रतापगडावर सुशोभीकरणाचे कामही आता मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. अफझलखान वधाला यंदा ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अफजलखानाच्या कबरीजवळ ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे त्या ठिकाणी, शिवभक्तांची मागणी लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजलखानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे! ते ट्विट पर्यटनमंत्र्यांनी केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami