संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

अभिजित पानसे यांनी घेतली वाझेची भेट! चर्चांना उधाण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मनसे नेते आणि चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी 100 कोटी वसूली प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांची भेट घेतली. या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. सचिन वाझे आणि अभिजीत पानसे यांच्या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अभिजीत पानसे यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात जाऊन सचिन वाझेची भेट घेतली आणि दोघांमध्ये बराचवेळ सविस्तर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. नुकतच 100 कोटींच्या वसूली प्रकरणात सचिन वाझेने माफीचा साक्षीदार होण्याची विनंती मुंबई सत्र न्यायालयात केली होती. ही विनंती मान्य करत सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्याचं मान्य केलं. त्यानंतर मनसे नेते अभिजीत पानसे यांनी घेतलेल्या सचिन वाझेंच्या भेटीनं चर्चांना उधाण आलं आहे.

अभिजीत पानसे यांची ओळख मराठीतील एक उत्तम दिग्दर्शक म्हणून आहे. असं असलं तरी अभिजीत पानसे यांनी काही वर्षांपूर्वी मनसेत प्रवेश केलाय. त्यामुळे सिनेसृष्टी आणि राजकारण अशा दोन्ही गोष्टींशी अभिजीत पानसे यांचा जवळचा संबंध आहे. अभिजीत पानसे यांच्या ‘रेगे’ हा सिनेमा प्रचंड प्रसिद्ध आहे. ‘रेगे’ म्हणजे अभिजीत पानसे आणि अभिजीत पानसे म्हणजे रेगे असं समीकरण आहे. रेगे या सिनेमाचं सचिन वाझे यांच्याही खास कनेक्शन आहे. ते म्हणजे सचिन वाझे यांच्याबरोबर मिळून अभिजीत पानसे यांनी रेगे हा सिनेमा केला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami