संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

अभिनेता अभिनय बेर्डे करतोय गोव्यात ‘दिशाभूल’ चे चित्रीकरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आगामी ‘दिशाभूल’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. अभिनेता तेजस बर्वे, अभिनेत्री अमृता धोंगडे, माधुरी पवार यांच्या बरोबर ‘दिशाभूल’ मध्ये असलेला चौथा अभिनेता कोण? याची उत्सुकता संपूर्ण मराठी प्रेक्षकांना आहे. या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून महाराष्ट्राचा लाडका युवा अभिनेता अभिनय बेर्डे ‘दिशाभूल’ या मल्टीस्टारर मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल” या चित्रपटाची निर्मिती आरती चव्हाण यांची असून दिग्दर्शन आशिष कैलास जैन करत आहेत.

‘दिशाभूल’ या चित्रपटात अभिनय बेर्डे बरोबर ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता तेजस बर्वे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. तसेच ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री, प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय अभिनेते नागेश भोसले, अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेता प्रणव रावराणे, शुभम मांढरे, रुही तारू, अरुण कदम, सिद्धेश्वर झाडबुके, आशुतोष वाडेकर, शरद जाधव, मंदार कुलकर्णी, गौतमी देवस्थळी अशी तगडी स्टारकास्ट आहे. ‘दिशाभूल’ चे डीओपी वीरधवल पाटील आहेत तर चित्रपटाला क्रिस मस्करेन्हस, प्रथमेश धोंगडे यांचे संगीत व गीते हरिभाऊ धोंगडे यांची आहेत. नृत्य दिग्दर्शन नील राठोड, कला दिग्दर्शन वैभव शिरोळकर, वेशभूषा शीतल माहेश्वरी, मेकअप राजश्री गोखले, संकलन विनोद राजे, ध्वनी निलेश बुट्टे यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

आपल्या भूमिकेबद्दल सांगताना अभिनेता अभिनय बेर्डे म्हणाला, ‘दिशाभूल’ हा एक वेगळ्या धाटणीची कथा असलेलला चित्रपट आहे. यातील माझी व्यक्तीरेखा ही मी आज पर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आहे. चित्रपटाचे शुटींग आम्ही सध्या गोव्यात करत आहोत. याशिवाय पुणे आणि कोकणातही शूटिंग आहे, ‘दिशाभूल’ टीम बरोबर काम करणे एन्जॉय करतोय. कॉलेज विश्वातील मुलांभोवती फिरणाऱ्या ‘ दिशाभूल’ मध्ये नेमकं काय आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami