हैदराबाद – ‘लायगरचित्रपटाच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाची ईडीच्या अधिकाऱ्यांनी 12 तास कसून चौकशी केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि निर्मिती चार्मी कौर यांचीही या प्रकरणी चौकशी झाली होती. यावर्षी लायगर या चित्रपटाच्या माध्यमातून विजय देवरकोंडा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला निधी देण्यासाठी वापरण्यात आलेला पैसा हा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्टचे उल्लंघन करून परदेशातून आणल्याचा आरोप या चित्रपटाच्या टीमवर केला जात आहे. या प्रकरणाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ईडीने विजयची चौकशी केली. ईडी चौकशी झाल्यानंतर विजय म्हणाला की,‘लोकप्रियता असल्यावर काही समस्या आणि दुष्परिणाम होतातच. हा एक जीवनाचा अनुभव आहे. ईडीने मला बोलावल्यावर तिकडे जाणे हे माझे कर्तव्य आहे. मी तिकडे जाऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. नंतर त्यांनी मला पुन्हा फोन केला नाही.