संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अभिनेता सलमान खानला डेंग्यू’ बिग बॉस -१६’चे शूटिंग थांबवले!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

करण जोहर तात्पुरते काम करणार !

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सलमान खानला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे, त्यामुळे बिग बॉस-१६ या शोचे शूटिंग आता रद्द करण्यात आले आहे, सलमान पुढचे काही आठवडे हा शो होस्ट करू शकणार नाही. त्याच्या जागी शोला काही दिवसांसाठी नवीन होस्ट मिळणार आहे. सलमान पूर्ण बरा होईपर्यंत करण जोहर हा बिग बॉस-१६ चे काही भाग होस्ट करेल.कलर्स टीव्हीने करण जोहरचा टिझरही रिलीज केला आहे.
सध्या सलमान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचे शूटिंगही करत होता, मात्र आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो चित्रपटाच्या शूटिंगपासूनही ब्रेक घेणार आहे.डेंग्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी सलमानला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार,सलमान खानने स्वतः करण जोहरला बिग बॉस -१६ होस्ट करण्यासाठी राजी केले आहे.सलमानने स्वतः करणला फोन करून त्याला शो होस्ट करण्याची विनंती केली.त्यामुळे करण सलमानला नकार देऊ शकला नाही.आता करण शोचे पुढील काही एपिसोड होस्ट करताना दिसणार आहे.करण आणि सलमान दोघेही चांगले मित्र आहेत, जेव्हा सर्व कलाकारांनी करणच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात शाहरुखच्या विरुद्ध साइड हीरोची भूमिका करण्यास नकार दिला होता,तेव्हा सलमाननेच या चित्रपटात भूमिका साकारली होती. करणने याआधीही बिग बॉस ओटीटी शो होस्ट केला आहे, ओटीटीवर होस्ट म्हणून करणला खूप पसंती मिळाली होती.
दरम्यान, सलमानच्या जवळच्या एका चित्रपट अभिनेत्याने सांगितले की, सलमान डेंग्यूतून बरा होतोय. २५ ऑक्टोबरनंतर तो त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करू शकतो.डेंग्यूमुळे सलमान अद्याप कोणत्याही बॉलिवूड पार्टीत किंवा दिवाळी सेलिब्रेशन पार्टीत दिसला नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami