नव्वी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांची आई गीता देवी यांचे निधन झाले आहे. मनोज वाजपेयींची आई गीता देवी त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या.ज्येष्ठ चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. मनोज यांची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती. गीता देवी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गीता देवी यांचे आज सकाळी म्हणजेच गुरुवारी निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या.
गीता देवी यांच्यावर दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर आणि मॅक्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांच्या प्रकृतीत काही दिवसांपूर्वी सुधारणा दिसून आली होती.मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांचे निधन झाले. मनोज बाजपेयी यांच्या वडिलांचे एका वर्षापूर्वीच निधन झाले.आईच्या निधनानंतर मनोज यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.