मुंबई: – आपले आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने अधिक सुकर झाले आहेत. मात्र आता या अशा व्यवहारामुळे सायबर क्राइमचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढले जात आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारे सायबर क्राइमची शिकार होता होता बचावली आहे.उर्मिला कोठारेने एक इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे.
उर्मिलाने फ्रॉड मेसेजचा एक स्क्रीनशॉट केला शेअर केला होता. तिला हा मेसेज एका बॅकेच्या नावाने तिला आला आहे. त्या मेसेजमध्ये लिहिले होते की, तुम्ही एचडीएफसी बॅंकेतील खात्याची केवायसी अपडेट केलेली नाही. यामुळे तुमचे खाते ब्लॉक करण्यात आले आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. पुढे ती म्हणते की, अनेकदा असे मेसेज वाचल्यानंतर लोक लगेच पॅनिक होतात. लगेच या अशा लिंकवर क्लिक करतात. त्यामुळे तुमच्या खाजगी गोष्टींची माहिती फ्रॉड लोकांना मिळते.त्यामुळे तुमचे बॅंक अकाऊंट हॅक होऊ शकते. मला आलेल्या मेसेजमधली लिंक मी पाहिली पण त्याच एचडीएफसी बॅंकेचे पूर्ण नाव लिहिले नव्हते. त्यामुळे मला शंका आली. मित्रांनो माफ करा. नशिबाने साथ दिली. उर्मिलाने सदर घटना शेअर करत चाहत्यांना सतर्क केले.तिने आपल्या चाहत्यांना आव्हान केले की, तुम्हाला एखादा मेसेज आला किंवा लिंक आली तर तात्काळ सावध व्हा. कोणत्याही लिंकची खातरजमा केल्याशिवाय ती लिंक उघडू नका किंवा क्लिक करु नका.