कोल्हापूर:- लोकप्रिय मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचा रस्ते अपघातात मृत्यू झालेला आहे.कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा इथे एका डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झालेला आहे. ही बातमी कळताच सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. तिच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
कल्याणी काही दिवसांपूर्वीच हाॅटेल व्यवसाय उतरली होती. कोल्हापूरमधील हालोंडी फाटा येथे ‘प्रेमाची भाकरी’ नावाने हॉटेल सुरू केले होते. हॉटेल बंद करुन बाहेर पडत असतांना तिला डंपरने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. कोल्हापूर-सांगली मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्येच आता अभिनेत्री कल्याणी हिचाही मृत्यू झाला आहे.