नवी दिल्ली- घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्याशी निकटचे संबंध असल्याचा आरोप झालेली चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फनार्र्ंडिसने आज ईडीसमोर हजर राहत आपला जबाब नोेंदवला. या आधीही सुकेशसोबत असलेल्या संबंधांच्या अनुषंगाने ईडीने जॅकलिन फनार्र्ंडिस व नोरा फतेही यांची चौकशी केली होती. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले होते. हा खुलासा झाल्यानंतर ईडीने जॅकलिनची सात कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.