मुंबई – अभिनेत्री राखी सावंत यांचे आदिल खान यांच्या सोबत लग्न झाले होते मात्र लग्नानंतर आदिल खान यांनी अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर अत्याचार आणि घोर अन्याय केल्याच्या निषेधार्थ उद्या 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ओशिवरा पोलीस ठाणे जोगेश्वरी पश्चिम येथे आरोपी आदिल खान याच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
अभिनेत्री राखी सावंत या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहेत. त्यांचे आदिल खान यांच्या सोबत लग्न झाले होते.मात्र कौटुंबिक हिंसाचार ; मारहाण; अत्याचार आणि अन्याय आदिल खान याने राखी सावंत यांच्या वर केला असल्याची राखी सावंत यांची तक्रार आहे. अत्यंत वाईट वर्तणूक आणि कृत्य आदिल खान याने केल्याची माहिती राखी सावंत यांनी दिली असून त्यानुसार नराधम आरोपी आदिल खान याच्या नीषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वर्सोवा तालुक्याच्या वतीने उद्या 16 फेब्रुवारी रोजी रिपाइं चे वर्सोवा तालुका अध्यक्ष सुनिल पवार ; जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव;किशोर मासुम ; जयंती गडा यांच्या नेतृत्वात ओशिवरा पोलीस ठाणे येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.