मुंबई : व्हायरल पेटा फोटोशूट मॉडेल आणि सविता भाभी फेम अभिनेत्री रोजलिन खान कॅन्सर रोगाने त्रस्त झाली आहे. याबाबत तिने तिच्या इंस्टग्राम हँडलवर एक फोटो शेअर करुन तिला कॅन्सर झाल्याचे सांगितले. याशिवाय ती मुंबईतील रुग्णालयात दाखल असून पुढील सात महिने तिच्यावर किमोथेरपी होणार आहे. तिच्या पोस्टखालील कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
अभिनेत्री रोजलिन खानने इंस्टाग्रामवर पोस्ट करून लिहिले की,’कॅन्सर, कठीण लोकांचे आयुष्य सोपे नसते, हे मी कुठेतरी वाचले होते. पण आता मला कळले आहे की ते माझ्यासारख्या लोकांसाठी आहे. देव त्यांना आशीर्वाद देवो. हाच लढा आणि विश्वास माझ्या आयुष्याचा एक अध्याय असू शकतो.प्रत्येक धक्का मला अधिक बळकट करतो.माझ्याकडे माझ्यासाठी प्रार्थना करणारी माझी माणसे आहेत. जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते. इतकेच नाही तर टक्कल असलेल्या मॉडेलला नोकरी देण्याचे धाडस तुमच्यात असायला हवे, असेही तिने लिहिले आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी लोक प्रार्थना करत आहेत. रोजलिन याआधी समीर अंजानच्या ‘आ भी जा’ या गाण्यात रजनीश दुग्गलसोबत दिसली होती.