संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणात राहुल नवलानीला अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इंदौर – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी राहुल नवलानी याला पोलिसांनी इंदूरमध्ये अटक केली. तो व्यावसायिक आहे. त्याच्या विरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती. वैशालीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. २९ वर्षांच्या वैशालीने रविवारी इंदौरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. राहुल व त्याच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.
टीव्ही मालिका अभिनेत्री वैशाली ठक्करने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने शेजारी राहणारा राहुल आणि त्याची पत्नी दिशाने आपल्याला जगणे मुश्किल केले होते. त्यांनी मानसिक त्रास दिला. त्याला कंटाळून आत्महत्या करत आहे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल, असे तिने सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी राहुल आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा नोंदवून लुकाऊट नोटीस जारी केले होते. त्यांची माहिती देणारास ५ हजाराचे इनामही जाहीर केले होते. मात्र रात्री पोलिसांनी राहुलला इंदोरमधील घरातूनच अटक केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami