संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

अमरावती जिल्हा रूग्णालयाच्या लहान मुलांच्या आयसीयूला आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात आग लागल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या आगीत दोन बालके जखमी झालीआहेत. जखमी बालकांना पंजाबराव देशमुख रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या वृत्तांसुर, आज सकाळी लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात आग लागली. यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली. आगीची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या नातेवाईकांनी विभागात धाव घेत तेथील लहान मुलांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आले. यावेळी दोन मुले किरकोळ जखमी झाली आहेत. आग लागल्यामुळे रुग्णालय पसरलेल्या धुरामुळे लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेकांना तात्काळ हलवण्यात आले. परंतु, आग अटोक्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून अद्याप याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी या ठिकाणी तत्काळ भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. तसेच, प्रसंगवधान दाखवल्याने त्यांनी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami