मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज सकाळी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी अभिनेता अभिषेक बच्चन त्यांच्यासोबत होता. बिग बींचा ऊंचाई हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. त्यापूर्वी त्यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेत चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली.
अमिताभ बच्चन हे सार्वजनिक ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून दिसत नव्हते. मात्र ऊंचाई चित्रपट प्रदर्शित होताच त्यांनी आज अभिषेक बच्चनला सोबत प्रभादेवातील सिद्धीविनायक मंदिर गाठले आणि गणरायांचे दर्शन घेतले. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह अनुपम खेर, बोमन ईराणी, नीना गुप्ता, सारिका, परिणिती चोप्रा, नफीसा अली आणि डॅनी डेंजोंगप्पा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याआधी चित्रपटावरुन प्रतिक्रिया देताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, ‘चित्रपटगृहात जाऊन, तिकिट विकत घेऊन चित्रपट पाहण्याची मजा काही वेगळीच असते. कृपया आमचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जा. सध्या कोणी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीये. हात जोडून विनंती आहे की, कृपया तिकिट काढून चित्रपट पाहा.‘