संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

अमिताभ बच्चन यांचा अंगरक्षक जितेंद्र शिंदे पोलिस दलातून निलंबित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन यांचा माजी अंगरक्षक जितेंद्र शिंदे याला मुंबई पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे. त्याने आपल्या पत्नीच्या नावावर सेक्युरिटी एजन्सी सुरू केली होती. त्यासाठी अमिताभ बच्चन आणि परदेशातून मोठी रक्कम आली होती. याशिवाय जितेंद्र शिंदे परवानगी न घेता चार-पाच वेळा दुबई आणि सिंगापूरला गेला होता. या प्रकरणात त्याची चौकशी करण्यात आली. त्यात तो दोषी आढळल्यामुळे त्याला निलंबित केले आहे. आता त्यांची विभागीय चौकशी होणार आहे.

मुंबई पोलिस दलातील जितेंद्र शिंदे २०१५ पासून अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. त्याने पत्नीच्या नावावर सुरक्षा एजन्सी सुरू केली होती. या सेक्युरिटी कंपनीत परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचा आरोप होता. त्यामुळे त्याच्या एजन्सीची चौकशी सुरू आहे. त्याने सरकारची कोणतीही परवानगी न घेता परदेश वाऱ्या केल्या आहेत. तो चार ते पाच वेळा वरिष्ठांना माहिती न देता दुबई आणि सिंगापूरला जाऊन आला आहे. या प्रकारामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिंदेची चौकशी सुरू होती. त्यात दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami